मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराजच्या मातोंड ग्रामसभेला प्रतिसाद

Edited by: दिपेश परब
Published on: September 19, 2025 18:52 PM
views 100  views

वेंगुर्ले : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान शुभारंभ बाबत मातोंड ग्रामपंचायतची ग्रामसभा १७ सप्टेंबर रोजी येथील मातोंड सोसायटी हॉल येथे आयोजित करणेत आली होती. या ग्रामसभेला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी सरपंच मयुरी वडाचेपाटकर, उपसरपंच आनंद परब, पंचायत समिती कृषी विस्तार अधिकारी सुप्रिया कोरगावकर, ग्रामपंचायत सदस्य राहुल प्रभू, सुजाता सावंत, आर्या रेडकर, वैभवी परब, किरण मातोंडकर, ग्रामपंचायत अधिकारी प्रल्हाद इंगळे, ग्राम महसूल अधिकारी दर्शन बोरकर,आरोग्य सेवक मेस्त्री, आशा, अंगणवाडी सेविका, बचतगट सीआरपी रश्मी सावळ, वेदिका मेस्त्री, अश्विनी परब, ग्रामसंघ अध्यक्ष सीमा परब, माजी सरपंच जान्हवी परब, कृषी सहाय्यक, कोतवाल, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या सहित बचत गट महिला, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

यावेळी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान बाबत, स्वच्छता ही सेवा २०२५ बाबत सविस्तर माहिती ग्रामपंचायत अधिकारी प्रल्हाद इंगळे यांनी दिली.