
वेंगुर्ला : ज्या महिलांच्या अंगी अंगभूत कौशल्य आहे, त्यांना आज व्यवसायात वेगवेगळ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. म्हणूनच महिलांनी आपल्या कौशल्याचा उपयोग आपल्या अर्थांजनासाठी केला पाहिजे, असे आवाहन चिपळूण येथील उमा इन्स्टिट्युटच्या संचालिक उमा म्हाडदळकर यांनी मॅट रांगोळीच्या प्रशिक्षणाप्रसंगी केले.
लिनेस क्लब, वेंगुर्लातर्फे अॅड. सुषमा प्रभूखानोलकर यांनी १७ सप्टेंबर रोजी वेंगुर्ला येथील श्रीमती शिला गावडे यांच्या निवासस्थानी मॅट रांगोळी प्रशिक्षण आयोजित केले होते. या प्रशिक्षणाला महिलांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभताना सुमारे ५० महिलांनी याचा लाभ घेतला. उमा म्हाडदळकर यांनी उपस्थित महिलांना मॅट रांगोळीचे प्रशिक्षण दिले. यावेळी लिनेस क्लब अध्यक्षा पल्लवी कामत, कॅबिनेट ऑफिसर उर्मिला सावंत, हेमा गावस्कर, मंदाकिनी सामंत, अंजली धुरी, मृण्मयी केरकर आदी उपस्थित होत्या. अॅड.सुषमा प्रभूखानोलकर यांनी यापूर्वी घेतलेल्या फॅशन डिझायनिग प्रशिक्षण, नऊवारी साडी शिवणे, कापसापासून हार बनविण्याचे प्रशिक्षण आदी उपक्रमांची माहिती दिली. मॅट रांगोळी प्रशिक्षणादरम्यान, डॉ.सुप्रिया रावळ, स्मिता वागळे, मधुरा आठलेकर, मयुरी केरकर, भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष सुजाता पडवळ, महिला जिल्हा उपाध्यक्ष वृंदा गवंडळकर, आकांक्षा परब, साक्षी पेडणेकर, कृपा मोंडकर, प्रार्थना हळदणकर यांच्यासह अन्य महिला उपस्थित होत्या. हेमा गावस्कर यांनी प्रशिक्षक उमा म्हाडदळकर व प्रशिक्षणासाठी जागा उपलब्ध करून देण्या-या शिला गावडे यांचे आभार मानले.