ग्रामीण भागातील गुणवत्तेला पैलू पाडण्याचे काम करणाऱ्या खर्डेकर महाविद्यालयाचा अभिमान : विशाल परब

Edited by: दिपेश परब
Published on: September 19, 2025 15:47 PM
views 32  views

वेंगुर्ले : वेंगुर्ले येथील बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाला मुंबई विद्यापीठाचा सर्वोत्तम ग्रामीण विद्यालय पुरस्कार प्राप्त होणे ही केवळ वेंगुर्ले वासियांसाठीच नव्हे तर पूर्ण कोकणसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. शिक्षण क्षेत्रातील उत्तुंग कामगिरी बजावणाऱ्या या महाविद्यालयाचा भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सन्मान करताना आम्हा सर्वांना अत्यंत आनंद होत आहे. भविष्यात हीच परंपरा कायम राखताना आम्ही सर्वजण महाविद्यालयाच्या पाठीशी राहून आपली अशीच अभिमानास्पद ओळख जगाच्या नकाशावर न्यावी यासाठी सर्वतोपरी सहकार्याचा हात देऊ, असे अभिवचन भाजपा युवा नेते विशाल परब यांनी दिले. 

१५ सप्टेंबरला मुंबई विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट महाविद्यालय म्हणून बॅ बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाला पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी महाविद्यालयाला भेट देत प्राचार्य डॉ गोस्वामी तसेच संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांचा सन्मान केला. 

यावेळी ॲड. अनिल निरवडेकर यांच्यासह प्राचार्य डॉ. डी.बी. गोस्वामी, संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण, पर्यवेक्षक डी.जे. शितोळे सर, स्टाफ सेक्रेटरी विवेक चव्हाण, कार्यालय अधीक्षक संभाजी पाटील, आयक्यूओसी को ऑर्डिनेटर एस.एच. माने, जिमखाना चेअरमन वीरेंद्र देसाई यांच्यासहित प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. सचिन परुळकर यांनी केले.