जनतेमध्ये जात त्यांचे प्रश्न समजून घ्यायला हिम्मत लागते ; मनीष दळवींचे प्रतिउत्तर

Edited by: दिपेश परब
Published on: September 15, 2025 16:39 PM
views 119  views

वेंगुर्ले : तालुक्यातील लोकांना जिल्ह्यापर्यंत येणे खर्चिक होते. प्रवासाचा प्रश्न निर्माण होतो. बऱ्याच अडचणी येतात. या अडचणी त्यांना होऊ नये, तालुक्यापर्यंत जाऊन त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात म्ह्णून पालकमंत्री यांनी वेंगुर्ला तालुक्यातुन तालुकास्तरीय जनता दरबाराना सुरुवात केली.  उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या काही नेत्यांनी या जनता दरबार बद्दल काही व्यक्तव्य केली. त्यांनी या गोष्टीचा विचार करावा की त्यांच्या सत्ता स्थानाच्या काळात त्यांनी कधीही अशा प्रकारचा ना जिल्ह्य स्तरावर कोणता जनता दरबार घेतला ना तालुका स्तरावर, ना गावपातळीवर घेतला. कारण जनता दरबार घेण्यासाठी जनतेमध्ये थेट जाऊन जनतेचे प्रश्न समजून घेऊन त्याला न्याय देण्यासाठी, संवाद करण्यासाठी हिम्मत असावी लागते, पारदर्शकता असावी लागते अस प्रतिउत्तर जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी जनता दरबारावर टीका करणाऱ्यांना दिले.

वेंगुर्ले येथे आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी  बोलत होते. यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष पप्पू परब यांच्यासाहित पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना मनीष दळवी म्हणाले, नितेश राणे पालकमंत्री झाल्यानंतर जिल्हा स्तरावर जनता दरबार झाले. जिल्हा स्तरावर जनता दरबार घेत असताना प्रत्येक तालुक्यापर्यंत जावं असा निर्णय त्यांनी घेतला. कारण लांबच्या तालुक्यातील लोकांना जिल्ह्यापर्यंत येणे खर्चिक होते. प्रवासाचा प्रश्न निर्माण होतो. बऱ्याच अडचणी येतात. या अडचणी त्यांना होऊ नये, तालुक्यापर्यंत जाऊन त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात म्ह्णून पालकमंत्री यांनी वेंगुर्ला तालुक्यातुन तालुकास्तरीय जनता दरबाराना सुरुवात केली. खरंतर त्यांनी यासाठी वेंगुर्ला तालुक्याची निवड केली म्ह्णून. वेंगुर्ला वासीयांच्या वतीने आम्ही त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. या जनता दरबारामध्ये मोठ्या संख्येने वेंगुर्लेवासीय उपस्थित होते. 

उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या काही नेत्यांनी या जनता दरबार बद्दल काही व्यक्तव्य केली. त्यांनी या गोष्टीचा विचार करावा की त्यांच्या सत्ता स्थानाच्या काळात त्यांनी कधीही अशा प्रकारचा ना जिल्ह्य स्तरावर कोणता जनता दरबार घेतला ना तालुका स्तरावर, ना गावपातळीवर घेतला. कारण जनता दरबार घेण्यासाठी जनतेमध्ये थेट जाऊन जनतेचे प्रश्न समजून घेऊन त्याला न्याय देण्यासाठी, संवाद करण्यासाठी हिम्मत असावी लागते, पारदर्शकता असावी लागते. ज्या नेत्याची प्रशासनावर स्वतःची पकड आहे तोच नेता अशा प्रकारे जनता दरबार घेऊ शकतो. नितेशजींच्या माध्यमातून या तालुक्यातुन आलेल्या अनेज प्रश्नांचे त्याठिकाणी तात्काळ निर्णय लागले. प्रशासकीय बाब जर या टीका करणाऱ्या लोकांच्या लक्षात येत नसेल की प्रशासकीय बाबींमध्ये निर्णय घेण्याचे अधिकार त्या त्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी असतात. पालकमंत्री यांनी निर्देश दिल्यानंतर त्या निवेदनावर कोणत्या प्रकारची कार्यवाही करणे अपेक्षित आहे किंवा कोणती कार्यवाही करणार आहेत याची उत्तरे त्याठिकाणी समोरासमोर संबंधित अधिकाऱ्यांच्या माध्यमातून घेण्यात आली आहेत. 

त्यामुळे या जनता दरबारामध्ये ७० टक्के पेक्षा जास्त निवेदनांचे प्रश्न त्याचठिकाणी मार्गी लागले. उर्वरित काही प्रकरणात जी प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण आवश्यक आहे ती झाल्यानंतर ती प्रक्रिया पुढील १५ दिवसात नक्की मार्गी लावली जाईल. पालकमंत्री यांच्या कार्यालयातूनही याबाबत पाठपुरावा केला जात आहे. जनतेचे अधिकाधिक प्रश्न सुटावेत, प्रशासकीय कामकाज गतिमान व्हावं गतिमान पद्धतीने सर्व प्रश्नांना वाचा फुटावी या दृष्टिकोनातून या जनता दरबाराचे आयोजन होते. ज्या चांगल्या गोष्टी घडतात त्याला चांगलं म्हटलं पाहिजे चांगल्या गोष्टीना स्वीकारलं पाहिजे. आणि जनतेचे प्रश्न सुटत असतील तर कोणाला वाईट वाटण्याचं करण नाही. आपलं अपयश पुढे येईल अशा प्रकारची भीती जर ठाकरे शिवसेनेच्या लोकांना वाटत असेल तर तो तुमचा दोष आहे. या जनता बतबाराबद्दल सामान्य जनता समाधान व्यक्त करत आहे. या सर्वांच्या माध्यमातून लोकाभिमुख कारभार करण्याचा पालकमंत्री यांचा मानस आहे.