वेंगुर्लेत शिवसेनेच्या १८ रोजी वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

Edited by: दिपेश परब
Published on: August 16, 2025 20:01 PM
views 17  views

वेंगुर्ले : वेंगुर्ला शिवसेना व दीपकभाई केसरकर मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यामाने तालुक्यातील दहावी व बारावी प्रथम तीन क्रमांकानी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ सोमवार दिनांक १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता आयोजित करण्यात आले आहे. 

येथील बॅ नाथ पै समुदाय केंद्राच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या विद्यार्थी गुणगौरव समारंभासाठी राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री तथा सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे आमदार दीपक केसरकर उपस्थित राहणार आहेत. तसेच यावेळी तहसीलदार ओंकार ओतारी, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, मुख्याधिकारी हेमंत किरूळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तरी या सोहळ्यात सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना वेंगुर्ला तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, शहरप्रमुख उमेश येरम तसेच तालुक्यातील शिवसेना, युवासेना व महिला संघटनेच्या पदाधिकारी व शिवसैनिकांनी केले आहे.