
वेंगुर्ले : मठ गावात ११ केव्ही विद्युत लाईनच्या भूमिगत कामासाठी सुमारे १६ लाख रुपयांचा निधी आमदार दिपक केसरकर यांच्या माध्यमातून मंजूर झाला आहे. या कामचे भूमिपूजन शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावालकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, मठ सरपंच मठ रुपाली नाईक, आबा मठकर, माजी सरपंच किशोर पोतदार, पल्लवी कामत, अजित नाईक, बूथ अध्यक्ष अनिल तेंडोलकर, रामा शिंदे, प्रताप बोवलेकर, गौरव गावडे, संदीप ठाकूर, चंद्रकांत कोचरेकर, जगन्नाथ धुरी, महेश धुरी, जयवंत मटकर, संतोष धुरी आदी उपस्थित होते.