खानोली - सुरंगपाणी इथं आषाढी एकादशी भक्तिमय वातावरणात

Edited by: दिपेश परब
Published on: July 06, 2025 21:56 PM
views 20  views

वेंगुर्ले : श्री विठ्ठल पंचायतन देवस्थान खानोली- सुरंगपाणी येथे आज आषाढी एकादशी भक्तिमय वातावरणात साजरी झाली. आज आषाढी एकादशीनिमित्त या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सकाळी ८ वाजता विधिवत पूजा व अभिषेक श्री विठ्ठल पंचायतनचे संस्थापक प.पू. दादा पंडित महाराज यांच्या हस्ते संपन्न झाला. यानंतर सकाळपासून रात्रीपर्यंत श्री विठ्ठलाचा जयघोष व विविध भजनांचे कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी दिवसभर भाविकांनी श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले.