तुळस गावासाठी कायमस्वरूपी पुरुष वायरमन द्या

ग्रामस्थांची निवेदनाद्वारे मागणी
Edited by: दिपेश परब
Published on: June 23, 2025 20:46 PM
views 235  views

वेंगुर्ले : तुळस गाव मोठा असल्यामुळे तसेच गावात जंगलभागातून लाईन गेली असल्यामुळे व पावसाळ्यात रात्री वादळी वाऱ्यामुळे लाईनवर वारंवार झाडे पडत असल्याने सद्यस्थितीत असलेल्या महिला वायरमन यांना रात्र- अपरात्री बोलावणे अवघड होते. त्यामुळे त्वरित पुरुष वायरमन तुळस गावाला देण्यात यावा. 

तसेच तुळस गावात सर्व लाईनवर झाडेझुडपे वाढलेली असल्यामुळे लाईट ट्रिप होऊन वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत होतो. यामुळे गावातील ग्रामस्थांची गैरसोय होत असून गणपती शाळेत विद्युत पुरवठा खंडित झाल्यावर कामाचा खोळंबा होत असल्यामुळे त्वरित सर्व लाईन वरील वाढलेली झाडे झुडपे तोडून घेण्यात यावी. अन्यथा ग्रामस्थांकडून आंदोलनाचा घेण्यात येईल असा इशारा तुळस ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे वेंगुर्ले विद्युत वितरण विभागाला दिला आहे. दरम्यान याची तात्काळ दखल घेऊन येत्या दोन दिवसात झाडेझुडपे तोडून लाईन साफ करण्यात येईल. तसचं वरिष्ठांशी बोलून लवकरात लवकर पुरुष वायरमन देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन प्रभारी उपकार्यकरी अभियंता कोठावळे यांनी दिले आहे. 

यावेळी सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र परब, संतोष राऊळ, वैभव होडावडेकर, समीर तांबोस्कर, राजू गोरे, उमेश कुंभार, प्रमोद गोळम, शिवराज कुंभार, उत्तम  कुंभार,हरिश्चंद्र नाईक, उत्तम कुंभार, सिद्धेश शेटकर, रोहन सावंत आदी ग्रामस्थ उपस्थित होते.