SSC RESULT 2023 ; वेंगुर्ले तालुक्याचा निकाल 99.12 टक्के

परी सामंत, प्रतीक्षा नाईक प्रथम
Edited by: दिपेश परब
Published on: June 02, 2023 20:45 PM
views 279  views

वेंगुर्ला : माध्यमिक शालांत दहावी परीक्षात वेंगुर्ले तालुक्यातून परीक्षेला बसलेल्या एकूण ६८६ विद्यार्थ्यांपैकी ६८० विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ९९.१२ टक्के निकाल लागला.  तालुक्यात अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परुळे हायस्कुलची परी नित्यानंद सामंत व न्यू इंग्लिश स्कुल उभादंडाची प्रतीक्षा प्रदीप नाईक दोघीना ४९१ गुण (९८.२० टक्के) गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला. तर वेंगुर्ला हायस्कुल वेंगुर्लाच्या सानिका राजन सावंत हिने ४८७ (९७.४० टक्के) गुण मिळवून द्वितीय व अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परुळे हायस्कुलची तृषा सचिन वारंग ४८२ गुण (९६.४० टक्के) तृतीय क्रमांक मिळविला.

तालुक्यात एकूण १९ शाळांपैकी १७ शाळेंचा निकाल १०० टक्के लागला. यात दाभोली इंग्लिश स्कुल दाभोली,  वेंगुर्ला हायस्कूल, वेंगुर्ला, आर.के. पाटकर हायस्कूल, न्यू इंग्लिश स्कूल, उभादांडा, सिंधुदुर्ग विद्या निकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल,  मदर तेरेसा इंग्लिश मिडीयम स्कुल, अणसूर-पाल हायस्कूल, शिवाजी हायस्कूल, तुळस, श्री देवी सातेरी हायस्कूल, वेतोरे, रा. धो. खानोलकर हायस्कूल, मठ, कृषिरत्न काकासाहेब चमणकर हायस्कूल, आडेली, श्री माऊली विद्यामंदिर, रेडी, श्री सरस्वती विद्यामंदिर आरवली टांक, आसोली हायस्कूल, आसोली, स. का. पाटील केळुस, अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परुळे, मातोश्री पार्वती राऊत विद्यालय रेडी या शाळांचा निकाल १०० टक्के लागला.