वेंगुर्ले शहर शिवसेना व देऊळवाडा ग्रामस्थांतर्फे तेजस्विनी गावडेचा सन्मान

Edited by: दिपेश परब
Published on: August 28, 2024 09:33 AM
views 127  views

वेंगुर्ला : शहरातील देऊळवाडा येथील रहिवासी व सर्वसाधारण कुटुंबातील तेजस्विनी चंद्रकांत गावडे हिने वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) यात राष्ट्रीय एरोस्पेस प्रयोगशाळा येथे फिजिक्स या विषयात पीएचडी पदवी प्राप्त करत उज्वल यश संपादन केल्याबद्दल वेंगुर्ले शहर शिवसेना व देऊळवाडा ग्रामस्थ यांच्यावतीने तिचा सन्मान करण्यात आला. 

यावेळी बोलताना शहरप्रमुख उमेश येरम म्हणाले की, तेजस्विनी गावडे हिने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कोणत्याही प्रकारचे क्लासेस किंवा मार्गदर्शन नसताना स्वकर्तृत्वार हे यश संपादन केले आहे. अशाच प्रकारे इतर विद्यार्थ्यांनी सुद्धा या विद्यार्थिनीचा आदर्श घेऊन आपल्या आई वडिलांनी घेतलेल्या कष्टाची जाणीव ठेवत यश संपादन करावे असे ते म्हणाले. यावेळी महिला शहर संघटिका ऍड श्रद्धा परब- बाविस्कर, उपशहर संघटिका मनाली परब, अल्पसंख्यांक शहर संघटिका शबाना शेख, शाखाप्रमुख राजू परब, बाळा परब, आपा परब, देऊळवाडा ग्रामस्थ अरविंद परब, बाबल परब, महेंद्र गोळम, प्रणव येरम, आकांशा येरम, पल्लवी तुळसकर, अश्विनी गावडे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.