
वेंगुर्ले : सागर सुरक्षा व नववर्ष प्रारंभ अनुषंगाने वेंगुर्ले पोलिसांकडून आज दिवसभर वाहनांची कसून तापसणी करण्यात आली. सागरी सुरक्षा अंतर्गत ऑपरेशन "विजय" अंतर्गत ही सागरी महामार्गावरून जाणाऱ्या गाड्यांची तपासणी वेंगुर्ले मानसी पुल नजीक करण्यात आली. तसेच किनाऱ्यावर जाऊन मच्छिमार बांधवांना सूचना देत माहिती घेण्यात आली.
आज सकाळी ६ वाजल्यापासून सायंकाळी ६ पर्यंत ही गाड्यांची तपासणी करण्यात आली. तर रात्री ऑल आउट ऑपरेशन व कॉम्बिन्ग ऑपरेशन अंतर्गत सायंकाळी ६ ते पहाटे ३ वाजेपर्यंत ३१st डिसेंबर च्या अनुषंगाने पेट्रोलिंग द्वारे तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती वेंगुर्ले पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी दिली आहे.










