
वेंगुर्ले : वेंगुर्ले शहरात आज सोमवारी भाजपकडून जोरदार प्रचार रॅली काढून शक्ती प्रदर्शन करण्यात आले. रॅलीला भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. संपूर्ण शहर परिसर भाजपमय बनला आहे. यावेळी “भाजपचा विजय असो, कमळाला मतदान करा..!!” वेंगुर्ल्याच्या विकासासाठी भाजपाला पुन्हा साथ द्या अशा घोषणा देण्यात आल्या.
वेंगुर्ले बस स्थानक येथून या भव्य प्रचार रॅलीला प्रारंभ झाला. तेथून सुंदरभाटले, कलानगर, जुना स्टॅड, दाभोलि नाका, शिरोडा नाका, रामेश्वर मंदिर करून कॅम्प, भटवाडी, हॉस्पिटलनाका, मारुती स्टॉप, बाजारपेठ, दाभोलीनाका, पिराचा दर्गा असे करत साई दरबाबर हॉल येथे रॅलीची सांगता करण्यात आली. रॅलीत पालकमंत्री नितेश राणे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, राजू राऊळ, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दिलीप उर्फ राजन गिरप, वेंगुर्ले तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब, महिला तालुकाध्यक्ष सुजाता पडवळ, नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार तसेच मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी सहभागी झाले होते.










