
वेंगुर्ला : १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत वायंगणी मध्ये रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिर ला चांगला प्रतिसाद मिळाला त्याच प्रमाणे १० वी आणि१२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले महिला आणि किशोरवयीन मुलींना स्वच्छतेचा दृष्टीने सॅनिटरी पॅड वाटप करण्यात आले. हे वाटप प्राथमिक स्वरूपाचे असून संपूर्ण गावातील महिला आणि किशोरवयीन मुलींना वर्षाला पुरतील येवढे वाटप करण्यात येणार आहेत. तसेच आत्मा या संस्थेच्या अध्यक्ष पदी नितीन मांजरेकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा ग्रामपंचायत वायंगणी यांच्या कडून शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित ग्रामपंचायत सरपंच दत्ताराम उर्फ अवी अरुण दुतोंडकर, उपसरपंच रविंद्र धोंड, वेंगुर्ला पंचायत समिती माजी सभापती यशवंत उर्फ बाळू परब, ग्रामपंचायत सदस्य अनंत केळजी, दिपाली नांदोसकर, विदया गोवेकर, सविता परब, विद्या कांबळी, राखी धोंड, माजी ग्रामपंचायत सदस्य आनंद दाभोलकर, वायंगणी ग्रामपंचायत अधिकारी मधुकर नवार, महसुल अधिकारी गौरी पराडकर, वायंगणी पोलिस पाटील स्वप्नाली मसुरकर, तळेकरवाडी पोलिस पाटील समिधा धुरी सर्व सिआरपी, ग्रामस्थ उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती मांजरेकर यांनी केले.