
वेंगुर्ला : वेंगुर्ला शिक्षक संघाने शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवान विद्यार्थी, तसेच सेवानिवृत्त शिक्षक दीप्ती दीपक कोचरेकर, भिवा सावंत यांचा तसेच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा, परसबाग, विविध क्षेत्रात प्राविण्य प्राप्त शिक्षकांचा गुणगौरव कार्यक्रम आयोजित केला होता.
सदर कार्यक्रमाला गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांची उपस्थिती लाभली. नाईक यांनी अखिल संघ ही शैक्षणिक, सामाजिक ,सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारी संघटना आहे या शब्दात कौतुक केले. तसेच कृषी अधिकारी चव्हाण, नवनियुक उपशिक्षणाधिकारी ढाने, तुळस प्रभाग विस्तार अधिकारी भाऊ कोनकर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थी वर्गासाठी घेतलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. तालुकाध्यक्ष तेजस बांदिवडेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण वळवी, राज्य उपाध्यक्ष म. ल.देसाई, राजा कविटकर, सुभाष सावंत यांनी आपले संघटनात्मक विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद गावडे आणि दिपेश परब यांनी तर आभार प्रदर्शन संजय परब यांनी केले.