
वेंगुर्ले : महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ला तालुका भाजपच्या वतीने येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप तसेच शहरातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून साजरा करण्यात आला.
यावेळी तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पपू परब, भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, जिल्हा निमंत्रीत सदस्य साईप्रसाद नाईक, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष सुजाता पडवळ, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष हेमंत गावडे, तालुका अध्यक्ष प्रणव वायंगणकर, अल्पसंख्यांक सेल चे सायमन आल्मेडा, हसीना बेगम मकानदार, जिल्हा का. का सदस्य प्रितेश राऊळ, नीलेश सामंत, ओबीसी मोर्चाचे शरद मेस्त्री, रमेश नार्वेकर, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष वृंदा गवंडळकर , शहराध्यक्ष श्रेया मयेकर, शहर चिटणीस रसिका मठकर, आकांक्षा परब, मानसी परब, मच्छीमार सेल चे अनंत केळुस्कर, बूथ अध्यक्ष पुंडलिक हळदणकर, कृष्णा हळदणकर, भूषण सारंग, किसान मोर्चाचे यशवंत पंडित, आसोली सरपंच बाळा जाधव, मातोंडचे सोमा मेस्त्री, बूथ अध्यक्ष शेखर काणेकर , राजन केरकर, गुरूनाथ घाडी, दाजी परब, माजी बूथ अध्यक्ष अजित कनयाळकर , बूथ अध्यक्ष सीताराम साळगावकर , संतोष सावंत, मारुती दोडशानट्टी, महेश प्रभुखानोलकर, श्री गावडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.