
वेंगुर्ला : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधत आयोजित गणित ऑलिम्पिक स्पर्धेत वेंगुर्ला शाळा क्र. १ च्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत शाळेची मान उंचावली . स्पर्धेत विद्यार्थ्यांनी एकूण ४ सुवर्ण, ४ रजत आणि २ कांस्य पदके पटकावत दैदीप्यमान कामगिरी केली आहे .
या यशस्वी विद्यार्थ्यांचा व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा शाळा व्यवस्थापन समितीच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अभिषेक वेंगुर्लेकर व पदाधिकारी यांचे हस्ते शिवजयंती दिनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी अभिषेक वेंगुर्लेकर यांसह समितीचे उपाध्यक्ष सौ. सेजल रजपूत, सदस्य सौ. इंद्रायणी पडवळ, शिक्षणप्रेमी संजय पिलणकर, गुंजन केळुस्कर, तसेच पालकवर्ग उपस्थित होते.
शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर हरमलकर, शिक्षकश्री.मांडे व श्री. व्हाव्हळे, तसेच शिक्षिका सौ. लीना नाईक व सौ. प्रगती आव्हाड यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.










