
कणकवली : शहरातील मुख्य बाजारपेठेतील प्रसिद्ध श्री देव महापुरुष मंदिर येथे रौप्यमहोत्सवानिमित्त दि. १९ ते २२ फेब्रुवारी या कालावधीत श्री देव गणपती व श्री देव महापुरुष यांच्या नवीन मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना तसेच कलशारोहण सोहळा भक्तिमय वातावरणात होत आहे. या उत्सवानिमित्त पालकमंत्री नितेश राणे यांनी गुरुवारी सायंकाळी मंदिरास भेट देऊन श्रींचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्रसाद अंधारी यांच्या हस्ते राणे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष राजन पारकर, सचिव महेंद्र सांबरेकर, खजिनदार मंदार सापळे, माजी अध्यक्ष राजेश सापळे, अशोक करंबेळकर,राजू मानकर, प्रद्युम्न मुंज, साकेडीचे उपसरपंच प्रज्वल वर्दम, अमित सापळे, चेतन अंधारी, सोहम वाळके, राजा राजाध्यक्ष,सुशील पारकर, दत्ता तोरस्कर, स्नेहा अंधारी, सौ. सापळे, सौ. मुंज, हरीष उचले, संदीप अंधारी, रज्जी कंडियन आदी मान्यवर व भक्तगण उपस्थित होते.
पालकमंत्री राणे म्हणाले, मुख्य बाजारपेठेत होत असलेला हा दिमाखदार आणि नावीन्यपूर्ण सोहळा शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारा आहे. यावेळी मंडळाच्या नियोजनबद्ध कार्याचे कौतुक करत त्यांनी उत्सवासाठी सर्वतोपरी सहकार्याची ग्वाही दिली. रौप्यमहोत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.










