कोकण ग्रामीण पर्यटन अंतर्गत वेंगुर्ला, सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यांना सुमारे ३ कोटींचा निधी..!

Edited by: दिपेश परब
Published on: March 16, 2024 06:50 AM
views 152  views

वेंगुर्ला : राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या कोकण ग्रामीण पर्यटन योजने अंतर्गत व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या विशेष प्रयत्नातून वेंगुर्ला, सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यातील ३४ विविध विकासकामांना सुमारे ३ कोटी ७ लक्ष एवढा निधी राज्य शासनामार्फत देण्यात आला आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार व ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या माध्यमातून  हा निधी देण्यात आला आहे. राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या कोकण ग्रामीण पर्यटन योजने अंतर्गत शालेय शिक्षण मंत्री तथा सावंतवाडी विधानसभा मतदार संघ आमदार दीपक केसरकर यांनी ही कामे मंजुरीसाठी शिफारस दिली होती.

तर सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तथा कोकण ग्रामीण पर्यटन जिल्हास्तरीय कार्यकारणी समिती अध्यक्ष यांनी मान्यतेस्तव शासनास सादर केलेल्या आराखड्यातील कोकण ग्रामीण पर्यटन अंतर्गत समाविष्ट असलेल्या सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील गावातील ही पर्यटन विषयक कामे मंजूर करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर यांनी दिली आहे.  दरम्यान एवढा भरगोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्वांचे जनतेतून आभार व्यक्त होत आहेत.