
वेंगुर्ले : शिंदे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आसोली पंचायत समिती मतदार संघात भाजपचे संकेत धुरी बिनविरोध निवडून आले आहेत. पक्षाची शिस्त आणि पक्ष संघटना वाढीसाठी तसेच वरिष्ठांच्या शब्दाचा मान ठेऊन आपण हा निर्णय घेतला. यात माझ्या सोबत असलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो अशी प्रतिक्रिया यावेळी अपक्ष उमेदवार अर्ज दाखल केलेल्या शिंदे शिवसेनेच्या संजय गावडे यांनी दिली आहे.










