
वैभववाडी : आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकीसरे जिल्हा परिषद मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार श्रावणी रोहन रावराणे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. त्यांनी मतदारसंघात गावभेट कार्यक्रमाला सुरुवात केली असून या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
सौ. रावराणे सध्या दररोज विविध गावांना भेटी देत नागरिकांशी थेट संवाद साधत आहेत. मतदारसंघातील नाधवडे,कोकीसरे,नापणे,करुळ, उंबर्डे या गावात त्यांचा प्राथमिक भेटी पुर्ण झाल्या. येथील विकासकामे, मूलभूत सुविधा, पाणी, रस्ते, आरोग्य व शिक्षण यासंदर्भातील समस्या ऐकून घेऊन त्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन त्या देत आहेत.
गावभेटी दरम्यान भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. कोकीसरे मतदारसंघात प्रचाराचा वेग वाढत असताना सौ.रावराणे यांच्या गावभेट कार्यक्रमामुळे भाजपाची पकड अधिक मजबूत होत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.










