
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील राजकीय रणधुमाळीने आता निर्णायक वळण घेतले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक इच्छुकांनी माघार घेतल्याने आता जिल्हा परिषदेच्या ९ गटांसाठी २२ उमेदवार, तर पंचायत समितीच्या १८ गणांसाठी ४५ उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत. या निवडणुकीत कुठे दुरंगी, कुठे तिरंगी, तर कुठे थेट चौरंगी' लढतीचा थरार पाहायला मिळणार आहे.
जिल्हा परिषद : पावशीत चौरंगी तर नेरूरमध्ये रंगतदार वळण
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पावशी मतदारसंघाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. येथे सर्वाधिक ४ उमेदवार रिंगणात आहेत.
पावशी (चौरंगी लढत): तुकाराम साईल (शिंदे शिवसेना), अमरसेन सावंत (उबाठा), भिकाजी जाधव (वंचित बहुजन आघाडी), भानुदास रावराणे (अपक्ष).
नेरूर देऊळवाडा: येथे 'उबाठा' गटाने अर्ज मागे घेत अपक्ष उमेदवार रुपेश पावसकर यांना पाठिंबा दिला आहे. त्यांची लढत शिंदे शिवसेनेचे संजय पडते यांच्याशी होईल.
दुरंगी लढती :
आंब्रड: शेजल परब (उबाठा) वि. दिपलक्ष्मी पडते (शिंदे शिवसेना).
वेताळ बांबर्डे: नागेश आईर (शिंदे शिवसेना) वि. बाजीराव झेंडे (उबाठा).
ओरोस बुद्रुक: सुप्रिया वालावलकर (भाजपा) वि. जान्हवी सावंत (उबाठा).
तेंडोली: आरती पाटील (भाजपा) वि. सुजाता गावडे (उबाठा).
घावणळे: सखाराम खोचरे (उबाठा) वि. दीपक नारकर (शिंदे शिवसेना).
तिरंगी लढती :
पिंगुळी: गंगाराम सडवेलकर (उबाठा), अजय आकेरकर (भाजपा) आणि गजानन राऊळ (मनसे).
माणगाव: रुपेश कानडे (शिंदे शिवसेना), प्रसाद नार्वेकर (अपक्ष) आणि रमाकांत ताम्हणेकर (उबाठा).
पंचायत समिती: जांभवडेत 'चौरंगी' तर अनेक ठिकाणी चुरशीची लढत
पंचायत समितीच्या १८ गणांमध्ये अनेक ठिकाणी अपक्ष आणि बंडखोर रिंगणात असल्याने मुख्य पक्षांची डोकेदुखी वाढली आहे.
१. चौरंगी आणि तिरंगी लढती:
जांभवडे (चौरंगी): धोंडी मडवळ (अपक्ष), बाळकृष्ण मडव (शिवसेना), सुभाष मडव (अपक्ष) आणि यशपाल सावंत (उबाठा).
तिरंगी लढती: वेताळ बांबर्डे - समृद्धी कदम शिवसेना उबाठा, अश्विनी सावंत शिवसेना शिंदे गट, सोस्मिता बांबर्डेकर अपक्ष.
ओरोस बुद्रुक- महादेव परब शिवसेना उबाठा, अमित भोगले भाजपा, योगेश तावडे अपक्ष.
तेंडोली- मंगेश प्रभू भाजप, विजय प्रभू काँग्रेस, निखिल ओरसकर अपक्ष.
पिंगुळी- साधना माडये भाजप, ममता राऊळ उबाठा, कश्मीरा शिरोडकर अपक्ष.
साळगाव- कृष्णा धुरी उबाठा, मिलिंद नाईक शिंदे सेना, प्रतीक सावंत अपक्ष.
माणगाव- योगेश धुरी उबाठा, कौशल जोशी शिंदे सेना, रत्नाकर जोशी अपक्ष, रत्नाकर जोशी यांची माणगाव पंचायत समिती उमेदवारी बंडखोरी.
झाराप-यज्ञेश गोडे उबाठा, सनम तेली भाजप, अनिकेत तेंडोलकर अपक्ष शिंदे सेना बंडखोर उमेदवार.
विशेषतः साळगावमध्ये प्रतीक सावंत (राष्ट्रवादी-शरद पवार), मिलिंद नाईक (शिवसेना) आणि कृष्णा धुरी (उबाठा) अशी लढत होईल.
२. दुरंगी लढती:
आंब्रड: दशरथ मेस्त्री (उबाठा) वि. नितीन म्हाडेश्वर (भाजपा).
कसाल: बापू पाताडे (शिवसेना) वि. संतोष कांदळकर (उबाठा).
पावशी: चित्रा पावसकर (उबाठा) वि. करुणा पावसकर (भाजपा).
नेरूर देऊळवाडा (उत्तर/दक्षिण): नीता नाईक शिंदे सेना वि. दीप्ती नाईक उबाठा(उत्तर) आणि अर्चना बंगे उबाठा वि. ममता देसाई भाजप (दक्षिण).
आवळेगाव श्रावणी तेरसे भाजप वि योगिता पवार उबाठा. डिगस निखिल कांदळगावकर शिंदे सेना वि नारायण मांजरेकर उबाठा.
पाट- प्राची कुंभार उबाठा वि प्रियांका जळवी शिंदे.
घावणळे - अर्चना घावनाळकर भाजप वि सोनिया मुंज उबाठा.
आणि गोठोस - दिव्यानी खरात शिंदे सेना वि दीक्षा तवटे उबाठा
येथेही थेट दोन उमेदवारांत सामना होईल.
निवडणुकीचे प्रमुख आकर्षण
या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि शिंदे शिवसेना-भाजपा महायुती यांच्यात थेट लढत असली तरी, अनेक ठिकाणी अपक्ष उमेदवारांनी आव्हान उभे केले आहे. झारापमध्ये भाजपचे सीताराम तेली यांच्यासमोर उबाठाचे यज्ञेश गोडे आणि अपक्ष अनिकेत तेंडोलकर यांचे आव्हान आहे. उमेदवारांची नावे निश्चित झाल्याने आता गावोगावी प्रचाराचा जोर वाढणार असून, मतविभाजन कोणाच्या पथ्यावर पडणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.










