वाहतुकीच्या योग्य नियोजनाबद्दल वेंगुर्ला पोलिसांचा सत्कार | रिक्षा चालक संघटनेचा पुढाकार

Edited by: दिपेश परब
Published on: July 13, 2023 18:46 PM
views 264  views

वेंगुर्ला : तालुक्यात गेल्या पर्यटन हंगामांत तसेच मानसिश्वर जत्रा कालावधीत वाहतुकीचे योग्य नियोजन करून रिक्षाचालकांना बहुमोल सहकार्य केल्याबद्दल वेंगुर्ला तालुका रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने वेंगुर्ला पोलीस निरीक्षक अतुल जाधव व वाहतूक पोलीस मनोज परुळेकर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच नुकताच पदभार स्वीकारलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक विद्या जाधव यांचेही स्वागत केले.


वेंगुर्ला तालुका रिक्षा चालक मालक संघटनेचे सदस्य यांची बैठक आज (१३ जुलै) वेंगुर्ला पोलीस ठाण्यात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत वाहतुकी संदर्भात तसेच रिक्षा पार्कींग व इतर बाबींवर चर्चा करण्यात आली. यावेळी बैठकी नंतर  रिक्षा चालक मालक संघटना तालुका अध्यक्ष एकनाथ राऊळ यांनी शाल श्रीफळ व पुष्प देऊन वेंगुर्ला शहरात वाहतुकीचे योग्य नियोजन होत असल्या बाबत हा सत्कार केला. यावेळी संघटनेचे मिलिंद निकम, सदा परब, लॉरेन्स फर्नांडिस, विलास धुरी, कमालाकांत डिचोलकर, उमेश आरोलकर, किशोर तेरसे, चैतन्य म्हापणकर, नारायण परब, अनिल तेंडोलकर, दादा केळुसकर, फटू शिरोडकर, डॅल्मीन डिसोजा, गोविंद जाधव, योगेश कळंगुटकर, महादेव नवार , प्रल्हाद सोनसुरकर, बशीर बागवान यांच्यासाहित ४० ते ५० रिक्षाचालक हजर होते.