
वेंगुर्ला : राखी हे नाते फक्त भाऊबहिणीपुरतेच मर्यादित न राहता, समाजातील रक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचे प्रतिक आहे. त्यामुळे सणाच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ला येथील भाजपा महिला मोर्चाच्या महिलांनी वेंगुर्ला पोलिस ठाण्याला भेट देत तेथील पोलिसांना राख्या बांधल्या.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अॅड.सुषमा प्रभूखानोलकर, जिल्हा महिला मोर्चा उपाध्यक्ष वृंदा गवंडळकर, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष सुजाता पडवळ, सरचिटणीस आकांक्षा परब, चिटणीस प्रार्थना हळदणकर, सदस्य मानसी परब, रसिका मठकर, ईशा मोंडकर, रिया वायंगणकर आदी महिला उपस्थित होत्या.
देशाची आणि समाजाची सुरक्षा करणाऱ्या या खऱ्या वीर बंधूंना प्रेम, सन्मान आणि शुभेच्छांचा संदेश यातून देण्यात आला. कर्तव्यदक्ष पोलीस आणि जबाबदार नागरिक यांच्यातील नातं अधिक घट्ट करणारा या सुंदर उपक्रमाचे कौतुक होत आहे.