
वेंगुर्ला : वेंगुर्ले तालुक्यातील आसोली गावातील श्री देव नारायण पंचायतन देवस्थानचा प्रसिद्ध दसरोत्सव आश्विन शुद्ध दशमीला शनिवार दि. १२ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ४ वाजता श्री देव नारायण मंदिर येथे साजरा केला जाणार आहे.
यानिमित्त आसोली येथे श्री देवी भूमिकादेवी मंदिरात गुरुवार दि. ३ ऑक्टोबर रोजी घटस्थापना कार्यक्रम मोठ्या उत्साहात ग्रामस्थांच्या उपस्थितीत होणार आहे. नवरात्रोत्सवानिमित्त देवीच्या मंदिरात दररोज ग्रामस्थांची भजने होणार आहेत.
आसोली श्री देव नारायणाच्या दसरोत्सवाला पंचक्रोशीतून तसेच विशेषतः मुंबई,गोव्यातून असंख्य भाविक उपस्थिती लावतात. तरी पंचक्रोशीतील तसेच मुंबई आणि गोवा येथील भाविकांनी या दसरोत्सवाला उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आसोलीतील समस्त गांवकरी व मानकरी मंडळी ,आसोली ग्रामस्थ आणि श्री देव नारायण पंचायतन देवस्थान कमिटी आसोलीतर्फे करण्यात आले आहे.