होडी पलटी ; खलाशी बेपत्ता

Edited by: दीपेश परब
Published on: May 24, 2024 06:03 AM
views 417  views

वेंगुर्ला: वेंगुर्ला बंदर येथे लहान होडी बुडून मध्यप्रदेश मधील ३ व रत्नागिरी येथील १ असे एकूण खलाशी बेपत्ता झाल्याची माहिती समोर येत आहे.

काल २३ मे रोजी रात्री वेंगुर्ला बंदर येथून माश्यांचा बर्फ वगैरे घेऊन एकूण ७ खलाशी मोठ्या होडीतच्या दिशेने निघाले होते. यावेळी अचानक आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने व उधाणाने होडी आपला मार्ग बदलून बाहेर गेली. यावेळी होडी वरील तिघांनी समुद्रात उडया घेतल्या व  खडकांच्या आधार घेऊन ते बंदर वर पोचले मात्र यानंतर होडी पलटी होऊन यातील उर्वरित ४ खलाशी बेपत्ता झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत समुद्रात शोधकार्य सुरू होते मात्र अद्याप ते बेपत्ताच आहेत.