भाजपचा ४५ वा स्थापनादिन वेंगुर्ले तालुक्यात जल्लोषात साजरा

वेंगुर्ले शहरात सगळ्या रस्त्यांवर पक्षाचे झेंडे लावून भाजपामय वातावरण .
Edited by:
Published on: April 06, 2025 21:04 PM
views 120  views

वेंगुर्ले : भारतीय जनता पार्टी चां आज 45 वा स्थापनादिन हा जल्लोषमय वातावरणात साजरा करण्यात आला. संपूर्ण तालुक्यातील ९३ बुथ वर झेंडावंदन करण्यात आले. प्रत्येक भाजप प्रमुख कार्यकर्त्याच्या घरावर पक्षाचा झेंडा फडकला. वेंगुर्ले शहराच्या हद्दीवर सुद्धा भाजपाचा झेंडा स्वागत करत होता तेथे पदाधिकारी यांनी झेंडावंदन केले. 

 *तालुका कार्यालयात जल्लोष* -

भाजपा वेंगुर्ले तालुका कार्यालयातील मोठ्या स्क्रीनवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तत्पूर्वी कार्याध्यक्ष रवींद्र जी चव्हाण यांचेही मार्गदर्शन व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे लाभले. महाराष्ट्रातील दीड कोटी सदस्य नोंदणी केलेल्या संघटनात्मक बांधणी बद्दल मा.रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना शाबासकी दिली. पक्षाचे या कार्यक्रमाचे वक्ते तथा जिल्हा सोशल मीडिया संयोजक श्रीकृष्ण परब यांनी पक्षाचे इतिहास, पक्षाची नितिमूल्यें  याबाबत मार्गदर्शन केले. सिंधुदुर्ग जिल्हा सदस्य नोंदणीत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर आला आणि वेंगुर्ले तालुकाही जिल्ह्यात अग्रेसर राहिला याबद्दल कार्यकर्तेंच अभिनंदन करण्यात आले. सिंधुदुर्ग भाजपाचा स्वतःचा पहिला नगराध्यक्ष वेंगुर्ले तालुक्याला मिळाला याचा गौरव कायम सुवर्ण अक्षरात राहील.  तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा उपाध्यक्षा सुषमा खानोलकर यांनी दिपप्रज्वलाने कार्यक्रमाची सुरुवात केली. तसेच जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि नियोजन केले. 

रामनवमी उत्साहात साजरी

तालुका कार्यालयात श्रीराम नवमी बद्दल श्रीरामांच्या फोटोचे पूजन माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, ॲड सुषमा खानोलकर, सरचिटणीस पप्पू परब यांच्या हस्ते झाले या प्रसंगी महिला मोर्चाच्या जिल्हा का सदस्य सौ. वृंदा गवंडळकर, तालुकाध्यक्ष सौ सुजाता पडवळ आणि सर्व सरपंच ,ग्रामपंचायत सदस्य, बुथ अध्यक्ष या ठिकाणी श्रीरामांच्या जयघोषात सामील झाले होते. 

    भारतीय जनता पार्टीचा ४५ वा वर्धापन दिन, महाराष्ट्रातील दीड कोटीची सदस्य नोंदणी आणि दीड लाखाच्या वर सिंधुदुर्गातील सदस्य नोंदणीच्या विक्रमी यशाच्या जल्लोषात साजरा झाला.