वजराट देवसुवाडी इथं वीणा भाट ठरल्या पैठणीच्या मानकरी

Edited by: दिपेश परब
Published on: January 20, 2024 12:17 PM
views 204  views

वेंगुर्ला : शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर आणि शिवसेना तालुका प्रमुख नितीन मांजरेकर यांच्या विशेष सहकार्यातून जि.प. प्राथ. शाळा वजराट देवसु नं. 2 येथे महिलांचा हळदी कुंकू आणि पैठणी खेळ मोठ्या दिमाखात संपन्न झाला. यावेळी वजराट ग्रामपंचायत सरपंच अनन्या पुराणिक, उपसरपंच प्रियांका केरकर, शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष प्रवीण पडते, प्रकाश सकपाळ, दिलीप वेंगुर्लेकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

     खेळ पैठणीचा या खेळात वीणा विलोचन भाट या पैठणीच्या मानकरी ठरल्या तर रजनी मुकुंद वेंगुर्लेकर व संजना तुलसीदास वेंगुर्लेकर या उपविजेत्या ठरल्या. तसेच प्रियांका केरकर, सावली विटेकर,  संजना वेंगुर्लेकर, अंतरा गोवेकर, वैदेही दळवी यांना इतर खेळात आकर्षक बक्षिसे मिळाली.  या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात महिला वर्गाने सहभागी होवून कार्यक्रमाला चार चाँद लावले. तसेच विजेत्या महिलांनी शालेय शिक्षणमंत्री दीपकभाई केसरकर व तालुका प्रमुख नितीन मांजरेकर यांचे  सहकार्याबद्दल विशेष आभार व्यक्त केले. तसेच या संपूर्ण कार्यक्रमाची धुरा साईप्रसाद केरकर, मुख्याध्यापिका रिया परब आणि शिक्षक राजेश परब यांनी सांभाळली. यावेळी ग्रामस्थांचे देखील बहुमोल सहकार्य लाभले. तसेच या कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन नेमेळे महाविद्यालयीन शिक्षक पांडुरंग दळवी यांनी केले.

    यावेळी सुनिल विटेकर, प्रथमेश जक्कुलवाड, तेजस वेंगुर्लेकर, महेश जक्कुलवाड, अनिल सकपाळ, अनिकेत वेंगुर्लेकर व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.