वेदांताची निरंतर सामाजिक बांधिलकी ; माटणेत आरोग्य शिबीर

नागरिकांनी मानले आभार
Edited by: संदीप देसाई
Published on: November 23, 2022 09:53 AM
views 182  views

दोडामार्ग :

नुसताच व्यवसाय नाही तर ज्या भागात आपण बिजनेस करतो तेथील लोकांचे, समाजाचे आपण देणे लागतो, या भावनेतून नेहमीच सामाजिक कार्य करणाऱ्या वझरे येथील  वेदांता सेसा कोकने पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. ग्रामपंचायत माटनेच्या सहकार्याने नुकतेच आरोग्य शिबीर घेण्यात आले.

         माटणे येथे झालेल्या या आरोग्य तपासणी व उपचार शिबिरात नेत्र, हृदयविकार, होमोग्लोबिन, दंत व त्वचा रोग आरोग्य तपासणी करण्यात आली.  सेसा कोक वझरे तर्फे गेल्या २ वर्षांत विविध आरोग्य विषयक प्रकल्प हाती घेण्यात आले असून माटणे पंचक्रोशीतील नागरिकांना आरोग्य सेवा देणे करिता पुन्हा एकदा या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर आरोग्य तपासणी शिबीर माटणे गावात आयोजन केल्याबद्दल सौ. किशोरी डीचोलकर सरपंच- माटणे, उपसरपंच झालबा गवस तसेच उपस्थित ग्रामस्थ यांनी वेदांता सेसा व्यवस्थापनाचे कौतुक केले. या शिबिरांमुळे आरोग्य विषयक जनजागृती होऊन आपल्या गावातील लोकांना महत्त्वाच्या वैद्यकीय सुविधा पुरविण्यात मदत होईल असे त्यांनी नमूद केले. शिबिराचा सर्व ग्रामस्थांनी लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.  यावेळी बाबाजी पागिरे - प्रमुख सेसा कोक यांनी CSR उपक्रमांतर्गत आरोग्य क्षेत्रात सर्व प्रकारचे सहकार्य  वेदांता सेसा कंपनी करणार असल्याचे आश्वासन दिले. या शिबिरात लाभार्थ्यांची मोफत तपासणी व औषधोपचार देण्यात आला. यावेळी आयी आरोग्य उपकेंद्र कर्मचारी व आशा सेविका यांनी शिबिरासाठी उपस्थित राहून सहकार्य केले. गंभीर आजारी रूग्णांसाठी सुसज्ज रूग्णवाहिका पुरवण्यापासून ते दोडामार्ग ग्रामीण रुगणलयाला आवश्यक वैद्यकीय उपकरणे आणि तालुक्यातील आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी सक्रियपणे सेसा कोक कंपनी कार्यरत आहे. यावेळी वेदांताचे अधिकारी आशिष पिळणकर, ग्रामपंचायत सदस्य, आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी ग्रामपंचायत सदस्य रुपेश गवस, ग्रामस्थ  सुनील गवस, साईनाथ गवस यांचे विशेष सहकार्य मिळाले.