
दोडामार्ग : ५०० जणांतुन 'बेस्ट टेन अवॉर्ड'चा मानकरी खोलपेवाडी साळ येथील वेदांत शिवानंद भोसले याने नुकताच पटकावला आहे. साखळी येथील रवींद्र भवन मध्ये राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा पार पडली त्यानंतर गोवा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांसह केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आदीच्या उपस्थितीत झाला सन्मान करण्यात आला.
खोलपेवाडी साळ येथील आणि शिवाजी राजे हायस्कूल स्कूल पालक कमिटी अध्यक्ष तथा उद्योजक शिवानंद दशरथ भोसले यांचे तसेच डॉ. सार्थता भोसले यांचा चिरंजीव आहे. शिवाजी राजे हायस्कूलचा नववीचा विद्यार्थी आहे. 'परीक्षा पे चर्चा' अंतर्गत एक्झाम वोरीयर्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून २८ मंत्र देण्यात आले होते. पैकी १३ वा मंत्र "Know Yourself -Be proud on own capability" यावर आधारीत स्पर्धा संपन्न झाली. वेदांतला वडील शिवानंद, आई डॉ. सार्थता, कलाशिक्षक महादेव मालवणकर यांचे लाभले मार्गदर्शन लाभले.