ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत वेद प्रवीण कुबलने पटकावले सुवर्णपदक

Edited by: प्रतिनिधी
Published on: April 18, 2023 23:56 PM
views 160  views

मालवण : डॉक्टर शिरोडकर एज्युकेशन सोसायटी मुंबई संचलित श्री रेकोबा माध्यमिक विद्यालयचा इयत्ता सहावीतील विद्यार्थी कुमार वेद प्रवीण कुबल याने ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत सुवर्णपदक पटकावले आहे. त्याला या परीक्षेसाठी पी. पी. कुबल सर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. त्याच्या या यशाबद्दल संस्था पदाधिकारी, शालेय समिती पदाधिकारी, स्थानिक समिती पदाधिकारी, पालक शिक्षक संघ, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद शिक्षकेतर कर्मचारी , पालक व विद्यार्थी यांनी कौतुक केले आहे.