
वैभववाडी : नळपाणी पुरवठा योजनेचे पुरेसे पाणी येत नसल्यामुळे मांगवली येथील वासुदेव बापु जुवाटकर यांनी मांगवली ग्रामपंचायत कार्यालयासमोर आज( ता.२९) सकाळपासून सुरू केलेलं उपोषण सरपंचांच्या लेखी आश्वासननांतर दुपारी स्थगित केले. गटविकास अधिकारी रामचंद्र जंगले यांच्या उपस्थितीत उपोषणकर्त्यांनी हा उपोषण स्थगितीचा निर्णय घेतला.
ग्रामपंचायत मांगवलीच्यावतीने केला जाणारा पाणी पुरवठा पुरेसा येत नाही. हा पाणी पुरवठा सुरळीत व्हावा या मागणीसाठी श्री जुवाटकर यांनी आज सकाळपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. या उपोषण स्थळी गटविकास अधिकारी जंगले यांनी भेट दिली. श्री जुवाटकर यांच्या मागण्या जाणून घेतल्या. त्यांची समजूत घातली. तसेच त्यांच्या मागण्या आठ दिवसांत सोडविल्या जातील असे लेखी आश्वासन ग्रामपंचायतीच्यावतीने दिले.
यानंतर श्री जुवाटकर यांनी हे उपोषण स्थगित केले. यावेळी सरपंच शिवाजी नाटेकर , ग्रामपंचायतीचे सदस्य, पोलीस पाटील कमलाकर लिंगायत आदी उपस्थित होते.