वसई सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेची जादा गणपती स्पेशल रेल्वे सोडण्याची मागणी

Edited by: विनायाक गावस
Published on: June 28, 2023 11:45 AM
views 289  views

सिंधुदुर्ग : वसई सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटना मुंबईच्या वतीने कोकण रेल्वे मार्गावरती जादा गणपती स्पेशल रेल्वे सोडण्याचे मागणी केली.

गणपती स्पेशल १८०० फेऱ्यांची केली मागणी तर सर्व सुपरफास्ट एक्सप्रेस मिरजमार्गे चालवाव्यात दरवर्षी गणेश उत्सवाला मुंबईतून लाखो चाकरमानी कोकणात जातात चार महिन्यापूर्वी कोकणात जाणार्‍या सर्व ट्रेनचे पहिल्या दोन मिनिटांमध्ये बुकिंग फुल झाल्याने गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार अनेक चाकरमनी रेल्वेबुकिंग च्या प्रतीक्षेत आहेत, सध्या मध्य रेल्वेने डिक्लेअर केलेल्या गणपती स्पेशल ट्रेन ह्या कोकणात जाणाऱ्या चाकरमन्यांच्या तुलनेत अत्यअल्प आहेत,कोकणाला गणपतीसाठी साधारणता १८०० फेऱ्यांची आवश्यकता आहे, गणेश चतुर्थी १९ सप्टेंबरला असल्याने ९ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबरच्या दरम्याने कोकण रेल्वे मार्गावर प्रत्येक दिवसाला किमान २५ अप आणि २५ डाऊन अशा नवीन जादा गणपती स्पेशल रेल्वे सोडाव्यात तर दरम्यानच्या काळात कोकण रेल्वे वरील कंटेनर वाहतूक पूर्णतः बंद करावी तसेच सर्व लांब पल्याच्या रेल्वे जसे १२४३२ निजामुद्दीन देवेंद्रम,१९५७८ जामनगर तिरुपती,१२२८४ निजामुद्दीन एरनाकुलम,२२६३४ निजामुद्दीन त्रिवेंद्र,१२४८८ अमृतसर कोचीवली ह्या फक्त सुपरफास्ट एक्सप्रेस फक्त रत्नागिरीत थांबतात, तर त्या पंजाब, दिल्ली,राजस्थान,गुजरात,महाराष्ट्र,गोवा,कर्नाटक,केरळ करून तामिळनाडू पर्यंत धावणाऱ्या त्या सर्व सुपरफास्ट एक्सप्रेस पनवेल, पुणे मिरज मार्गे दक्षिणेत न्यायात त्याच्याने कोकण रेल्वेवरील वाहतुकीतील अडथळे दूर होतील व जास्तीत जास्त गणपती स्पेशल ट्रेन कोकण रेल्वे मार्गावर चालवण्यात जातील.

सर्वसामान्य प्रवाशांना एसटी बस किंवा लक्झरीचे तिकीट परवडणारे नसल्याने अनेक चाकरमनी प्रवासासाठी कोकण रेल्वेचा पर्याय निवडतात दरवर्षी पश्चिम रेल्वे वरून गणपती साठी सर्वात कमी रेल्वे सोडल्या जातात त्यात यावर्षी वाढ करावी,पश्चिम रेल्वेच्या वसई,मुंबई सेंटर,बांद्रा,वलसाड, सुरत, अहमदाबाद येथून तर मध्य रेल्वेच्या सीएसएमटी,दादर,कुर्ला,ठाणे,दिवा, कल्याण व पनवेल येथून कोकण रेल्वे मार्गावर रेल्वे सोडून चाकरमन्यांना चांगली सेवा उपलब्ध करून द्यावी, ही नम्र विनंती तरी कृपया कोकण रेल्वे, पश्चिम रेल्वे व मध्ये रेल्वे यांनी आमच्या मागण्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा व जास्तीत जास्त गणपती स्पेशल रेल्वे सोडाव्यात ही नम्र विनंती. असे निवेदनात म्हटले आहे.

तर निवेदनाची प्रत रेल्वेमंत्री मा.श्री.अश्विनी वैष्णव साहेब,केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मा.श्री.रावसाहेब दानवे, जनरल मॅनेजर पश्चिम रेल्वे,जनरल मॅनेजर मध्य रेल्वे, रत्नागिरी व सिंधुदुर्गचे खासदार मा.श्री.विनायक राऊत साहेब,केंद्रीय उद्योग मंत्री मा.श्री.नारायणराव राणे साहेब,माझी रेल्वेमंत्री मा.श्री.सुरेश प्रभू साहेब, पालघर चे खासदार मा.श्री.राजेंद्रजी गावित साहेब, रायगडचे खासदार मा.श्री. सुनील तटकरे साहेब व बोरिवली चे खासदार मा.श्री.गोपाळ शेटी साहेब यांना या निवेदनाची प्रत दिली असून या निवेदनावर प्रवासी संघटनेचे अध्यक्ष श्री.शांताराम नाईक व प्रवासी संघटनेचे सेक्रेटरी श्री.यशवंत जडयार यांनी सह्या केल्या आहेत.