हेवाळे श्री राम पंचायतन मंदीरात उद्या विविध कार्यक्रम

Edited by:
Published on: January 21, 2024 06:27 AM
views 198  views

दोडामार्ग : अयोध्या येथे नवनिर्मित श्री राम मंदीरात प्रभू श्रीरामांच्या बालमूर्तीची प्रतिष्ठापना होत असून सर्व हिंदूंचे श्री राम मंदीर होणे हे अनेक शतकापासूनचे स्वप्न साकार होतय. या सुवर्ण दिवसाचे औचित्य साधून हेवाळे मुळस येथील पुरातन पांडवकालीन श्री राम पंचायतन मंदीरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व राम भक्तांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन हेवाळे ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.

संपूर्ण दिवसभर मंदिरात विविध कार्यक्रम होणार आहेत. यात  सकाळी ०८.०० ते ०९.०० वा. श्री राम पंचायतन देवदेवतांची पुजा व अभिषेक, सकाळी ०१.०० ते ११.०० वा. श्री राम नाम जप यज्ञ, सकाळी ११.०० ते दुपारी ०१.०० वा. प्रभु श्री रामांचे भजन, आरती, महामंत्राचा जप व तिर्थ प्रसादाचा कार्यक्रम, दुपारी ०१.०० ते ०४.०० वाजेपर्यंत महाप्रसाद, सायंकाळी ५ नंतर ग्रामस्थांचे सश्राव्य भजन,  संध्याकाळी ७ ते ८ दीपोत्सव, ८ ते १० ह.भ.प.पू. विष्णू बाळकृष्ण कांदे महाराज (रा. हुमरस, ता. कुडाळ) यांचे साश्रव्य कीर्तन व रात्री १०.०० वा.  श्री देवी माऊली दशावतार नाट्य मंडळ इन्सुली, ता. सावंतवाडी यांचा शिव भरतराज संग्राम यांचा नाट्यप्रयोग होणार आहे.