कारिवडे भैरववाडी वार्षिक महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

Edited by:
Published on: May 13, 2025 19:41 PM
views 7  views

सावंतवाडी : कारिवडे भैरववाडी वार्षिक महोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन  करण्यात आले आहे.सालाबादाप्रमाणे यंदाही भैरववाडी ग्रामविकास प्रतिष्ठानातर्फे श्री क्षेत्र ईस्वटी देव स्थळावर उद्या दिनांक १४ मे रोजी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जागृत देवस्थान म्हणून ओळखण्यात येणाऱ्या कारिवडे गावातील भैरवाडीतील श्री ईस्वटी देव स्थळावर दरवर्षी याच तारखेला वार्षिक महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.

या निमित्ताने श्री देव सत्यनारायण महापूजा, ग्रामस्थांची भजने, दशावतार नाटक तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. नित्यनियमाने दरवर्षी पार पडणाऱ्या या सोहळ्याला पंचक्रोशीतील भाविक मोठ्या प्रमाणावर भेट देतात. यावर्षीही भाविकांनी या महोत्सवाला भेट देऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती भैरववाडीतील ग्रामस्थांतर्फे करण्यात आली आहे. कार्यक्रमांची रूपरेषा स. ९ वा. श्री देव सत्यनारायण महापूजा,स. १०.३० वा.,    आरती स. ११.०० वा. , हळदी कुंकू  दु. ०१.०० वा.      -   महाप्रसाद दु. ०२.०० वा.     -    महिलांची फुगडी, सायं. ०४.०० वा. -  ग्रामस्थांचे भजन ,सायं. ०७.०० वा.   मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम रात्रौ. ०८.३० वा. -     सत्कार समारंभ रात्रौ. १०.०० वा. -      दशावतार नाट्यप्रयोग - खानोलकर दशावतार नाट्यमंडळ सादर केल जाणार आहे.