विलवडे वरचीवाडी शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्ष सांगता सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम !

Edited by: विनायक गांवस
Published on: January 11, 2024 07:21 AM
views 68  views

सावंतवाडी : विलवडे वरचीवाडी प्राथमिक शाळा नं ३ च्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या सांगता सोहळ्यानिमित्त गुरूवारी ११ जानेवारीला विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या रौप्य महोत्सवी वर्षाच्या सांगता सोहळ्याचे उद्घाटन सावंतवाडी संस्थानचे युवराज श्रीमंत लखमराजे भोसले यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे तर प्रमुख पाहुणे गटविकास अधिकारी व्ही एम नाईक, सरपंच प्रकाश दळवी, उपसरपंच विनायक दळवी, माजी उपसभापती कृष्णा सावंत, विलवडे देवस्थान प्रमुख बाबुराव दळवी, तंटामुक्त समिती अध्यक्ष प्रदीप दळवी, गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर, माजी सरपंच मोहन दळवी, विलवडे पतसंस्थेचे व्यवस्थापक सोनू दळवी,  केंद्रप्रमुख नरेंद्र सावंत, माजी केंद्रप्रमुख संदीप गवस आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

       

यानिमित्त सकाळी ९ वाजता श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १ वाजता आरती व तिर्थ प्रसाद, सायंकाळी  भजन, रात्री ८ वाजता रौप्य महोत्सवी वर्षाच्या सांगता सोहळ्याचे मान्यवरांच्याहस्ते उद्घाटन होणार आहे. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह या शाळेत सेवा बजावलेल्या माजी शिक्षकांचा तसेच आजी-माजी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. रात्री ९ वाजता  दत्त माऊली दशावतार नाट्य मंडळाचा (सिंधुदुर्ग) 'छिन्नमस्ता' हा ट्रिकसीन युक्त दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन रौप्य महोत्सव समिती अध्यक्ष एकनाथ दळवी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा  उत्कर्षा दळवी, पालक शिक्षक व माता पालक संघ तसेच, शाळेच्या मुख्याध्यापिका रुपाली मिशाळ आणि विलवडे वरचीवाडी ग्रामस्थांनी केले आहे.