
दोडामार्ग : तालुक्यातील प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या घोटगेवाडी येथील विठ्ठलरखुमाई मंदिरात कार्तिकी एकादशी उत्सवाचा कार्यक्रम शुक्रवार दि. ०४ नोव्हेंबर 2022 रोजी होणार आहे, यात सकाळी श्री विठ्ठल मूर्तीचे पूजन, सायंकाळी 7.30 वाजता ग्रामस्थांची महाआरती, आणि तदनंतर रात्री ८ वाजता कुंडई गोवा येथील दिंडीपथकाचा वारकरी भजनाचा कार्यक्रम होणार आहे. तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन वैश्य समाज घोटगेवाडी तर्फे करण्यात आले आहे.