आषाढी एकादशी निमित्त विविध कार्यक्रम

Edited by: विनायाक गावस
Published on: June 28, 2023 14:56 PM
views 262  views

सावंतवाडी : गुरुवार २९ जून देवशयनी आषाढी एकादशी, सकाळी ६ वाजता अभिषेक स्नान काकडा आरती महाआरती पूजेचे मानकरी डॉ‌‌ प्रवीण मसुरकर यांच्या उपस्थितीत होणार आहे. सकाळी 11 वाजता संगीत सद्गुरु विद्यालयाचा भक्ती गीतांचा बहारदार कार्यक्रम, दुपारी २ वाजता कारिवडे भजन  मंडळ भजन, चार वाजता गोवा भजन मंडळ बुवा अमित तांबोसकर, सायंकाळी सहा वाजता प्रा सौ स्मिता प्रभाकर आजेगावकर यांचे  कीर्तन विषय1) कान्होपात्रा चरित्र 2) बोधले पाटील द्वादशी 3) संत सखु आख्यान २ जून  ह भ प  विणा परब यांचे कीर्तन 3 जून ह भ प वासुदेव सर्वेलकर बुवा यांचे काला कीर्तन होऊन या उत्सवाची सांगता होईल सकाळी १० वाजता श्रींची पालखी भटवाडी विठ्ठल रखुमाई मंदिरकडे जाईल.