श्री जाणता राजा प्रतिष्ठान मंडळ नेमळेच्यावतीने विविध कार्यक्रम

Edited by: विनायक गांवस
Published on: February 13, 2025 11:58 AM
views 157  views

सावंतवाडी : श्री जाणता राजा प्रतिष्ठान मंडळ नेमळे यांच्यातर्फे हिंदुस्थानचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळा बुधवार दि 19 फेब्रुवारी 2025 रोजी नेमळे देऊळवाडी येथील शिवस्मारक येथे साजरा होत आहे. यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

सकाळी 8 वा गड पूजन व शिव स्मारक अभिषेक, सकाळी  8.30 वा दांडपट्टा, भालाफेक, तलवारबाजी व भलाफेक, प्रशिक्षण सकाळी -10 वा.- रांगोळी स्पर्धा दुपारी 3 वा - महिलांसाठी हळदीकुंकू सायं 7 वा - समई नृत्य ( आई सातेरी महिला मंडळ देऊळ वाडी ) रात्रौ 7.30 वा - पोवाडा, स्लो गन व शिवगर्जना स्पर्धा रात्रौ 8 वा - जिल्ह्यातील ऐतिहासिक वेशभूषा व रेकॉर्ड डान्स स्पर्धा बालगट व खुला गट रात्रौ 9.30 वा -खेळ रंगला शिव जन्मोत्सवाचा गाव मर्यादित पारंपारिक वेशभूषा प्रश्न मंजुषा उखाणे आदि कार्यक्रम होणार आहे.

सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घयावा असे आवाहन जाणता राजा प्रतिष्ठान मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे