
मंडणगड : लाटवण पंचक्रोशी मराठी माध्यमीक विद्यामंदिराचे सुर्वण महोत्सवी वर्षांचे निमीत्ताने लाटवण हायस्कुल माजी विद्यार्थी संघाचेवतीने 22 व 23 मार्च 2025 विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. (22) मार्च 2025 रोजी माजी विद्यार्थी क्रीकेट सामने, विद्यार्थ्यांसाठी डॉ. भुषण चव्हाण यांचे माध्यमातू आऱोग्य शिबीर, विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहलसंमलेन व स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे.
(23) मार्च 2025 रोजी लाटवण हायस्कुल सुवर्ण महोत्सव मँरोथॉन स्पर्धा, बक्षीस वितरण समारंभ, विद्यार्थी करियर मार्गदर्शन, शिवव्याख्याते प्रशांत देशमुख यांचे व्याख्यान, स्नेहभोजन, गुरुजनांचा सत्कार सोहळा, लाटवण हायस्कुल वाटचालीसंबंधी लघुपट प्रदर्शन व सांस्कृतीक समारंभाचे आय़ोजन करण्यात आले आहे.
दोन दिवस चालणाऱ्या कार्यक्रमांचे मुख्य स्वागत समारभ गृहराज्य मंत्री योगेश कदम, आमदार भाई जगताप, आमदार निरंजन डावखरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे. माजी आमदार संजय कदम, मराठा महासंघाचे अध्यक्ष दिलीप जगताप, अभिजीत गांधी, राजेंद्र फणसे, शिवव्याख्याते प्रशांत देशमुख, उद्योगपती ताबिश हमजा, डॉ. भुषण चव्हाण यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित लाभणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या कार्यक्रमाचे आय़ोजनासाठी प्रशालेच्या माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष अविनाश सोंडकर, सचिव मनोज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मंचाचे सर्व माजी विद्यार्थी मेहनत घेत आहेत.
सुर्वण महोत्सवी वर्षांचे औचीत्याने माजी विद्यार्थी संघाने आयोजीत केलेल्या मँरोथॉन स्पर्धेत तालुक्यातील खेळाडूनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन मंचाचेवतीने करण्यात आले आहे.