
सांगुळवाडीत महाशिवरात्रीनिमित्त श्रीमंत जगदोजीराव किर्ती मंदीरात विविध कार्यक्रम
वैभववाडी:सांगुळवाडी येथील श्रीमंत जगदोजीराव कीर्ती मंदिर (राववाडी )सांगुळवाडी येथे वार्षिक हरिनाम सप्ताह व महाशिवरात्र उत्सव दि १८ फेब्रुवारीला साजरा करण्यात येत आहे.यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
महाशिवरात्री दिवशी सकाळी ९ वा मंदीरात घटस्थापना करण्यात येणार आहे.त्यानंतर सकाळी ९.३०ते दुपारी २वाजेपर्यंत स्थानिक भजने होणार आहेत.दुपारी २ ते ४ वाजेपर्यंत हेत येथील हनुमान प्रासादिक भजन मंडळ बुवा संतोष खानविलकर यांच भजन होणार आहे.त्यांनंतर गावदेवी प्रासादिक भजन मंडळ डोंबिवली बुवा संजय पवार यांची ४ते ६ या वेळेत भजनरुपी सेवा होणार आहे.सायंकाळी ६ ते ८ या वेळेत खांबाळे येथील राजन साळुंखे हरिपाठ, रात्री ८ते १० वेंगुर्ले येथील बुवा जया गोरे यांच भजन आयोजित करण्यात आले आहे.रात्री १० ते १२ या वेळेत प्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प.जानकीताई सुर्यवंशी यांच किर्तन आहे.त्यानंतर कोकणातील ख्यातनाम बुवा विनोद चव्हाण व भालचंद्र केळूसकर यांची डबलबारी होणार आहे.पहाटे ४.३०ते ६.३० या वेळेत ह.भ.प.राजन साळुंखे यांच काकड आरती कार्यक्रम होणार आहे.असा भरगच्च कार्यक्रम यानिमित्ताने आयोजित करण्यात आले आहेत.या संपूर्ण कार्यक्रमासोबतच शिडवणे येथील ढोलपथकही असून ते या कार्यक्रमाची रंगत वाढविणार आहेत.महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी १९ फेब्रुवारी मंदिरात १ ते ३ या वेळेत महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.तरी सर्व भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन राववाडी सांगुळवाडी ग्रामस्थ यांनी केले आहे.