हनुमान जयंतीदिनी मळईत विविध कार्यक्रमांचे आयोजन

Edited by: नागेश दुखंडे
Published on: April 18, 2024 13:58 PM
views 77  views

देवगड :  मळईवाडी हनुमान मंदिर येथे येथील बाल मंडळ संगीत मेळा यांच्यावतीने २२ व २३ एप्रिल रोजी श्री हनुमान मंदिर वर्धापन दिन व श्री हनुमान जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

२२ रोजी सकाळी ७.३० वा. पूजा, आरती, ९ वा. लघुरुद्र, ११ वा. पासून मळई मर्यादित विविध स्पर्धा (रांगोळी, चित्रकला,कॅरम, बुद्धिबळ, हस्ताक्षर व प्रश्नोत्तर स्पर्धा), सायंकाळी ७ वा. दीपोत्सव, रात्री ८ वा. श्री देव मांडकरी प्रासादिक भजन मंडळ, मळई यांचे भजन, रात्री १० वा. श्री पावणाईदेवी प्रासादिक भजन मंडळ, किंजवडे परबवाडी यांचे दिंडी भजन.२३ रोजी सकाळी ६.१८ वा. श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा, आरती, दर्शन व तीर्थप्रसाद, ८ वा. पालखी पद्रक्षिणा, ११ वा. श्री सत्यनारायणाची महापूजा, तीर्थप्रसाद, दुपारी १ वा. महाप्रसाद, सायंकाळी ४ वा. महिलांसाठी होम-मिनीस्टर स्पर्धा (मळई मर्यादित), ७ वा. महाआरती, रात्री ८ वा. स्थानिक भजने, रात्री ९.३० वा. स्पर्धांचे बक्षीस वितरण,१० वा. स्थानिक कलाकारांची धमाल विनोदी एकांकिका लग्न कल्लोळ, ११ वा. ब्राम्हणदेव महिला मंडळ, नाद भोळेवाडी यांचे समई नृत्य सादर होणार आहे.या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा,असे आवाहन न्यास च्या वतीने करण्यात आले आहे.