
मंडणगड : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे जयंती सोहळ्याचे निमीत्ताने 19 फेब्रुवारी 2025 रोजी शहारातील विविध संस्थाच्या माध्यमातून वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राजे प्रतिष्ठान मंडणगड यांच्यावतीने रायगड ते मंडणगड शिवज्योत यात्रा, महिलांची बाईक रँली, शिवपालखी मिरवणुक, सांस्कृतिक कार्यक्रम व महिलांसाठी लकी ड्रॉ कुपन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील नागरिकांनी कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष योगेश जाधव यांनी केले आहे.
मैत्री फाऊंडेशन मंडणगड यांच्यावतीने मान्यवरांचे स्वागत सत्कार समारंभासह गरीब व गरजू लाभार्थिना संस्थेने दिलेल्या विमा कवच पॉलीसींचे वाटप करण्यात येणार आहे. तालुकावासीयांनी या कार्यक्रमास हजर राहण्याचे आवाहन अध्यक्ष मनोज मर्चंडे यांनी केले आहे.
सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान विभाग मंडणगड यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज जीवन चरित्र्यावर आधारीत चित्रकाल स्पर्धा, निबंध स्पर्धा, गायन स्पर्धा, बुध्दीबळ स्पर्धा, वेशभुषा स्पर्धा या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याबरोबर शिवरुद्र अँकेडमी श्रीवर्धन यांची मल्लखांब प्रात्यक्षिके व शिवकालीन शस्त्रांची माहीती व प्रदर्शनाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे.