
सावंतवाडी : माडखोल येथील श्री पावणाई मंदिरात नवरात्रौत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. घटस्थापनेपासून पुढचे नऊ दिवस विविध कार्यक्रम होणार आहेत. यात पारंपरिक भजने, फुगडी, दांडिया, दशावतारी नाटक, तसेच युवा कलाकारांचे गायनाचे कार्यक्रम नहोणार आहेत. दरवर्षी मंदिरातील मानकरी व ग्रामस्थांच्यावतीने हे कार्यक्रम होत असतात. यावेळी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन देवस्थान मानकरी दत्ताराम राऊळ यांनी केले आहे.