राजन तेलींच्या वाढदिनी दोडामार्ग भाजपाने राबविले विविध उपक्रम..!

Edited by: संदीप देसाई
Published on: July 25, 2023 19:21 PM
views 132  views

दोडामार्ग : दोडामार्ग भारतीय जनता पार्टीच्या वतीने माजी आमदार  राजन तेली यांच्या वाढदिवसानिमित्त दोडामार्ग तालुक्यामध्ये विविध सेवाभावी उपक्रम राबविण्यात आले. जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी व तालुकाध्यक्ष सुधीर दळवी यांच्या नेतृत्वाखाली हे समाजपयोगी उपक्रम राबविण्यात आले.

त्या अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र साटेली भेडशी येथील रुग्णालय फळ वाटप करण्यात आले. याठिकाणी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, तालुकाध्यक्ष  सुधीर दळवी, जिल्हा पदाधिकारी चंद्रकांत मळीक, रमेश दळवी,प्रकाश गवस, शक्तिप्रमुख संजय विरनोडकर, सूर्यकांत धर्णे, ओबीसी आघाडी प्रमुख सिद्धेश पांगम, राजाराम डिगणेकर, अजय दळवी, देऊ जाधव, डॉ. जगदीश पाटील, डॉ.बाबासाहेब राणे,आदी उपस्थित होते.

तर साटेली भेडशी खालचा बाजार शाळेत वह्या व खाऊ वाटप करण्यात आले. प्राथमिक शाळा बोडदे येथे शालेय उपयोगी साहित्य वाटप, मांगेली तळेवाडी प्राथमिक व माध्यमिक शाळेत वह्या वाटप,  मांगेली देऊळवाडी प्राथमिक शाळेत वह्या वाटप खाऊ वाटप करण्यात आले. तर कळणे प्राथमिक शाळा वह्या वाटप करण्यात येणार आहे. दरम्यान विविध ठिकाणी झालेल्या या कार्यक्रमात  मांगेली सरपंच सौ. सुनंदा नाईक, अजित नाईक, कळणे सरपंच अजित देसाई, ब्रिजेश नाईक, पाटये सरपंच  प्रविण गवस व शिक्षक वर्ग उपस्थीत होते.