वरेरी पाळेकर वाडी - धरणेवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरणाचा शुभारंभ..!

Edited by: नागेश दुखंडे
Published on: February 16, 2024 12:30 PM
views 74  views

देवगड : देवगड तालुक्यातील वरेरी धरणेवाडी रस्ता पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून आणि आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नातून मंजूर झाला. त्याचे भूमिपूजन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते आज पार पडले. या वेळी जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, सरपंच प्रिया गोलतकर, उपसरपंच सुभाष राणे, रुपेश पारकर, रघुनाथ धरणे, सुभोद मेस्त्री, गुंडू सावंत, शंकर नाटेकर, चंदू नाटेकर, सूर्यकांत धरणे, दत्ताराम मिराशी, पद्माकर धरणे, आप्पा धरणे, सुधाकर मांगावकर, शैलेश धरणे, प्रभाकर राणे ,संतोष बावकर ,सुहास जाधव ,गणेश पाळेकर ,विलास जाधव ,संदीप धरणे ,सूर्यदेव जाधव ,विजय कलनाथ ,बबन बोडेकर, झोरे, कामिनी नाटेकर, प्रकाश धरणे ,दत्तात्रय लाड ,संदेश जाधव ,ज्ञानेश्वर कलनाथ ,अनिल पाळेकर इत्यादी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर रस्ता खूपच नादुरुस्त झाला होता. रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.