वराडकर हायस्कूल कट्टा इथं आषाढी एकादशी निमित्त चित्र प्रदर्शनाचं आयोजन...!

Edited by: विनायाक गावस
Published on: June 29, 2023 12:54 PM
views 187  views

सिंधुदुर्ग : आषाढी एकादशी निमित्त वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा येथे" रंगी रंगला श्रीरंग "या वारी संदर्भातील चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.प्रशालेतील विद्यार्थ्यांनी अक्षर वारी, वारकऱ्यांची विविध पोट्रेट्स, वेगवेगळ्या माध्यमातून पांडुरंगाची. काढलेली  चित्र या प्रदर्शनात मांडण्यात आली. या प्रदर्शनात इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंत विद्यार्थी सहभागी झाले. या विद्यार्थ्यांना कलाशिक्षक समीर चांदरकर यांनी मार्गदर्शन  केले.

या प्रदर्शनाचे उद्घाटन भगीरथ ग्राम विकास संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर प्रसाद देवधर यांनी केले. त्यांच्या सोबत कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सुनिल नाईक, शालेय समिती अध्यक्ष सुधीर वराडकर, वराडकर  हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टाचे मुख्याध्यापक संजय नाईक व सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी उपस्थित झाले.

यावेळी विद्यार्थ्यांनी सुस्वर भक्ती गीते सादर केली. वराडकर हायस्कूल व  कनिष्ठ महाविद्यालय कट्टाच्या वतीने डॉक्टर प्रसाद देवधर यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी कट्टा पंचक्रोशी  शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजयराज वराडकर यांनी शुभेच्छा दिल्या.