सुर्लेत स्वयंसेवकांनी बांधला वनराई बंधारा

मुंडे महाविद्यालयाचे सुर्लेत श्रमसंस्कार निवासी शिबीर
Edited by:
Published on: December 27, 2024 16:09 PM
views 273  views

मंडणगड : येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे श्रमसंस्कार निवासी षिबीर दि. 17 ते 23 डिसेंबर-2024 दरम्यान तालुक्यातील सुर्ले येथे मोठया उत्साहात संपन्न झाले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री कर्मवीर दादा इदाते  यांच्या शुभहस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले तर गटविकास अधिकारी मा. श्री. विशाल जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिराचा सांगता समारंभ संपन्न झाला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहूल जाधव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी संस्थेचे कोषाध्यक्ष श्री. रविंद्रकुमार मिश्रा, सहकोषाध्यक्ष श्री. सुनील मेहता,  संचालक श्री. संतोष चव्हाण, श्री. आदेश मर्चंडे,  उपप्राचार्य डॉ. वाल्मिक परहर,  सरपंच रोशनी दिवेकर, श्री. अनंत शिंदे, कल्पेश शिंदे, श्रीधर शिंदे, आप्पा मोरे, जितेंद्र शिंदे, मनोज शिंदे  आदी मान्यवर उपस्थित होते. 

कार्यक्रमाच्या सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले व लोकनेते गोपीनाथजी मुंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. महेश कुलकर्णी यांनी केले. यावेळी श्री. संतोष चव्हाण, श्री. आदेश मर्चंडे, श्री. रमेष शिंदे, कल्पेश शिंदे, श्रीधर शिंदे, स्वयंसेवक कु. मिनाक्षी लोखंडे, ऋतुराज पवार  आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.

प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना पंचायत समिती मंडणगडचे गटविकास अधिकारी श्री. विशाल जाधव म्हणाले, आज समाजाला जलसंधारणाची निंतात गरज असून  याकरिता आपण सर्वांनी वृक्षतोंडीवर आळा घालणे आवश्यक आहे. तसेच अशा प्रकारच्या शिबीरातून राष्ट्रीय  एकात्मता जोपासण्याचे कार्य या माध्यमातून केले जाते. विद्याथ्र्यानी घेतलेल्या अनुभवाचा उपयोग स्वतःबरोबर समाजहितासाठी करावा असे त्यांनी सांगितले. 

अध्यक्षस्थानावरुन बोलताना प्राचार्य डॉ. राहूल जाधव म्हणाले, की राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत अनेक समाजोपयोगी कामे होत असतात, पण त्यासाठी ग्रमस्थांचा सहभाग देखील तितकाच  महत्त्वाचा  असतो. हे शिबीर समाज आणि विद्यार्थी या दोघांचे ऋणानुबंध दृढ करेल असा मला विश्वास वाटतो.

शिबीर कालावधीत व्यक्तिमत्व विकास व समाजप्रबोधन, ग्रामस्वच्छता, जलसंधारण व जलसाक्षरता, रस्ते-दुरूस्ती, आपत्कालीन व्यवस्थापन, सार्वजनिक आरोग्य जाणीव-जागृती व शिबीर, महिला सक्षमीकरण, सांस्कृतिक कार्यक्रम, वीज व पर्यावरण वाचवा जनजागृती आदी विविध उपक्रम राबविण्यात आले. शिबिर कालावधीत मंडणगडचे पोलीस निरिक्षक श्री नितीन गवारे - ‘सायबर सुरक्षा’, वैद्यकिय अधिकारी डॉ. अभिषेक गावंडे - ‘आपले आरोग्य’, पत्रकार अॅड. दयानंद कांबळे - ‘ग्रामीण पत्रकारिता’, डॉ.सुभाष सावंत -‘लोकसहभागातून ग्रामीण विकास’, श्री मोहन उपाध्ये - ‘कासव संवर्धन’  या विविध विषयांतील तज्ज्ञ मान्यवरांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन  केले. यावेळी घेण्यात आलेल्या आरोग्य शिबीरामध्ये ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.  शिबीर कालावधीमध्ये संस्थेचे संचालक  श्री. आदेश मर्चंडे, डॉ. शुभांगी गिरासे, टी.व्ही कलाकार श्री. सुबोध शिंदे, जिल्हा समन्वयक डॉ. राहूल मराठे, श्री. कल्पेश शिंदे, श्री. गिरीष जोशी, डॉ. अशोक साळुंखे, शिंदे राम देवरे, शिंदे विष्णू जायभाये, शिंदे शैलेश  भैसारे,  आदी मान्यवरांनी शिबिरास  सदिच्छा भेट दिली. 

शिबीर कालावधीमध्ये उल्लेखनीय कार्य करून अन्य स्वयंसेवकांसमोर आपला आदर्श ठेवणा-या कांही स्वयंसेवकांना सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून प्रथमेश मोरे तर सर्वोत्कृष्ट स्वयंसेविका म्हणून कु. ऋणाली  सागवेकर हिचा सन्मान करण्यात आला. सर्वोत्कृष्ट श्रमदान विभागात अरुण राठोड व कु. वृत्तीका खैरे यांचा तर सर्वोत्कृष्ट सांस्कृतिक कार्यक्रम विभागात ऋतुराज पवार व कु. आर्या कदम या स्वयंसेवकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी स्वयंसेवक तसेच ग्रामस्थांनी सात दिवसांमध्ये आलेले विविध अनुभव आपल्या मनोगताद्वारे व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.  महेश कुलकर्णी  यांनी तर शेवटी आभार कार्यक्रमाधिकारी डॉ.  शामराव वाघमारे यांनी मानले. 

शिबिरातील सर्व उपक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी संस्थेचे सर्व संचालक मंडळ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहूल जाधव, उपप्राचार्य डॉ.  वाल्मिक परहर, कार्यक्रमाधिकारी डॉ.  शामराव वाघमारे, डॉ. महेश कुलकर्णी, डॉ.  धनपाल कांबळे, डॉ. सुरज बुलाखे, प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी, एन. एस. एस. प्रतिनिधी सर्व गटप्रमुख, शिबिरार्थी स्वयंसेवक व ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.