'वंदे भारत'ला सावंतवाडी थांबा नाही ; हे अपयश मंत्री केसरकरांच : बबन साळगावकर

Edited by: विनायक गावस
Published on: May 31, 2023 20:32 PM
views 200  views

सावंतवाडी : 'वंदे भारत' एक्सप्रेसला सावंतवाडी रोड स्टेशनला थांबा मिळू शकला नाही हे अपयश स्थानिक आमदार दीपक केसरकर यांचा समजायचं का ? असा सवाल माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी शहर सर्वात मोठं शहर आहे. येथे मोठ्या संख्येने लोक राहतात. परंतु रेल्वे खात्याने सावंतवाडी शहरावरती सतत अन्याय केला आहे. आमच्या सावंतवाडी शहराला जर थांबे द्यायचे नसतील तर असलेले थांबे रद्द करा अस विधानं माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केल आहे.