वंचितने केला नारायण राणेंच्या वक्तव्याचा निषेध..!

Edited by:
Published on: December 04, 2023 13:14 PM
views 335  views

कणकवली : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना अटक करण्याची मागणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली आहे. याशिवाय प्रकाश आंबेडकर यांचा उल्लेख राणे यांनी एकेरी शब्दांत केल्याबद्दल त्यांच्या या कृतीचा सिंधुदुर्ग जिल्हा वंचित बहुजन आघाडीतर्फे येथील आप्पासाहेब पटवर्धन चौकात निषेध करण्यात आला.

यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नारायण राणेंच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर, कणकवली तालुकाध्यक्ष संजय जाधव, सत्यशोधक सेक्युलर फ्रंटचे नेते अॅड. सुदीप कांबळे, प्रमोद कासले, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी संदीप कदम, सुनील जाधव, रघुनाथ सोनवडेकर, संतोष हेळवलकर, काशीराम असणकर, भिवा तळगावकर, नीलकंठ कदम, भारतीय बौद्धमहा सभेचे शाहीर जनिकुमार कांबळे, दिपक कदम, सोनाली सरपंच भिमराव भोसले बहुजन आघाडीचे वेंगुर्ले तालुकाध्यक्ष व्ही. जी. कदम, सावंतवाडी शहराध्यक्ष प्रदीप कांबळे, सायरा बागवान,  सुनिता जाधव, सुनिता बीडवाडकर, रत्नमाला जाधव, रोशनी कदम, रेणुका पवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.