देवी पवणाईच्या हरिनाम सप्ताहास भाविकांच्या गर्दीे !

टाळ-मृदुंग, विठू नामाच्या गजराने वळिवंडे दुमदुमल
Edited by: नागेश दुखंडे
Published on: December 16, 2023 13:01 PM
views 173  views

देवगड : देवगड तालुक्यातील नवसाला पावणारी व हाकेला धावणारी असा महिमा असणाऱ्या वळिवंडे या गावच्या श्री देवी पवणाईचा वार्षिक हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात भाविकांच्या गर्दीेत संपन्न झाला. या हरिनाम सप्ताहात भक्तीगीतांबरोबरच टाळ-मृदुंगाच्या व विठ्ठल नामाच्या गजराने वळिवंडे गाव दुमदुमून गेला होता.


या हरिनाम सप्ताहात राञी वळिवंडे येथे आरेश्वर प्रासादिक भजन मंडळ आरे, ब्रह्मगणेश प्रासादिक भजन मंडळ कुवळे, श्री भगवती प्रासादिक भजन मंडळ तोरसोळे, श्री महालक्ष्मी प्रासादिक भजन मंडळ रेंबवली, श्री गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळ चाफेड या मंडळांनी काढलेल्या दिंड्या ‘ सर्वांचे आकर्षण ठरुन या दिंड्यांनी उपस्थितांची मने जिंकली. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या व बारा पाचातील वळिवंडे गावाची ग्रामदेवता असलेल्या देवगड तालुक्यातील वळिवंडे येथील श्री. पावणाई देवी देवालयात अखंड हरिनाम सप्ताह भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. या हरिनाम सप्ताहानिमित्त श्री. पावणाई देवालयातआकर्षक मंदिर सजावट करुन विद्युत रोषणाई करण्यात आली होती.

या हरिनाम सप्ताहाच्या उत्सवात देवगड येथील आरे , कुवळे , तरसोळे , रेंबवली, चाफेड, या गावांतील ५ भजनी दिंड्या हरिनाम सप्ताहात सहभागी झाल्या होत्या. हा सर्व हरिनाम सप्ताह  पाहण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. तसेच माहेरवाशीनींनी आवर्जून उपस्थिती दर्शवली होती. या हरिनाम सप्ताहाची सांगता पहाटे काकड आरतीने झाली. या हरिनाम सप्ताहामुळे गावात भक्तीमय वातावरण निर्माण होऊन विठ्ठल नामाच्या गजराने गाव दुमदुमून गेला होता.